कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Crime) दगडाने ठेचून खून केल्याची घटना ताजी असतानाच इचलकरंजीमध्येही आता दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली. इचलकरंजीमध्ये शहापुरातील शाळेच्या पाठीमागे अल्पवयीन यूवक सुशांत कांबळेचा (रा आसरानगर, इचलकरंजी) निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांकडून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. शर्यतीच्या कारणातून वाद झाला होता. हा वाद नशेत असताना वाढल्यानंतर खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुशांत मित्राच्या वाढदिवसासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. 


घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचा नाद


सुशांत हा भाऊ व आईसोबत राहत होता. त्याला घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचा नाद होता. शर्यतीच्या कारणावरून वाद सुरु होता. बुधवारी रात्री मित्राला भेटून येतो असे सांगून तो घरातून निघून गेला होता. आज (4 जुलै) सकाळी शहापूर येथील राजीव गांधी विद्यामंदिर या प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.


कोल्हापुरात तरुणाचा निर्घृण खून


दरम्यान, मंगळवारी दुपारी कोल्हापूर शहरामधील राजारामपुरी 15व्या गल्लीमध्ये पंकज निवास भोसले (वय 32, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. विशेष म्हणजे खूनी हल्ला करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघे सख्खे भाऊ आहेतत. राजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे आणि नीलेश विक्रम काटे (दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतलं आहे. तर उमेश काटे, अमित गायकवाड हल्लेखोर पसार झाले.


इतर महत्वाच्या बातम्या