Kolhapur Police: कोल्हापूर पोलिसांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. जिल्हांतर्गत पोलीस निरीक्षक (पीआय) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (एपीआय) बदल्या करण्यात आल्या आहेत. 25 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. कोल्हापूर शहरातील संवेदनशील असलेल्या शाहूपुरी पोलीस ठाण्याची जबाबदारी अजयकुमार सिंदकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आणि बदलीचे ठिकाण
अविनाश कवठेकर-लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, राजेंद्र सावंत्रे - शाहूवाडी, प्रकाश गायकवाड - पन्हाळा, स्नेहा गिरी - सुरक्षा शाखा, अजयकुमार सिंदकर - शाहूपुरी, संदीप कोळेकर - जयसिंगपूर, राजू ताशिलदार - शिवाजीनगर, प्रवीण खानपुरे - इचलकरंजी, किशोर शिंदे - हुपरी, सत्यवान हाके - शहापूर, राजेंद्र मस्के - भुदरगड, नंदकुमार मोरे -शहर वाहतूक, गजेंद्र लोहार - कागल , विकास भुजबळ - सायबर, ईश्वर ओमासे - राधानगरी, स्वाती गायकवाड -आर्थिक गुन्हे, अर्जुन घोडे-पाटील - गांधीनगर, दिगंबर गायकवाड - गोकुळ शिरगाव, पंकज गिरी - गोकुळ शिरगाव, रणजित पाटील- कळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
रविराज फडणीस-कुरूंदवाड, संदीप कांबळे -नेसरी, राजीव पाटील - शहर वाहतूक, इचलकरंजी, सुनील माने - गगनबावडा, कैलास कोडग - वाचक पोलीस अधीक्षक
एएसआय आणि पीएसआयमध्येही खांदेपालट
दुसरीकडे, कोल्हापूर परिक्षेत्रातील 40 सहाय्यक पोलिस निरीक्षक तर 55 पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये एकूण दहा जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नऊ जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. आठ जणांची विनंती बदली मान्य केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 17 उपनिरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदल्यांचे आदेश काढले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ज्यांचा विहित कालावधी पूर्ण झाला आहे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षकांमध्ये 55 जणांचे आदेश झाले असून, यामध्ये नऊ विनंती बदल्या अमान्य केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर दोन, सांगली तीन, सोलापूर ग्रामीण तीन आणि सातारा जिल्ह्यातील एका उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कोल्हापुरात चार उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून एकूण 55 बदल्यांमध्ये 13 जणांना आहे त्या ठिकाणी मुदत वाढ दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :