Kolhapur Crime : कामावरून घरी परत येत असताना मारहाण करून जबरदस्तीने मोपेड चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून मोपेडसह 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोडिंग्रे (ता. शिरोळ) या ठिकाणी ही घटना घडली होती.


3 सप्टेंबर रोजी नागनाथ दिनकर कांबळे (रा. मंगलनगर कोंडीग्रे, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) कामावरून घरी मोपेडवरून येत असताना गावच्या हद्दीत रात्री साडे बाराच्या सुमारास अनोळखी तीन इसमांनी मोटर सायकल आडवी मारली. त्यानंतर त्यांनी नागनाथ यांना थांबवून मारहाण केली व अॅक्टीव्हा मोपेड गाडी जबरदस्तीने काढून घेत चोरून नेली.  त्यानंतर जयसिंगपूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. चोरलेली मोपेड घेऊन संशयित आरोपी हातकणंगले ते सांगली बायपास रोडवर उमळवाड फाटा येथील राजा हॉटेल समोर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 


पथकाने उमळवाड फाटा येथे सापळा लावून (मस्तान पटेल, वय 20, रा. शिंदेमळा, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या एका अल्पवयीन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्रमांक (एमएच-09-डीएस- 8308) सह एकूण 40 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. 


सदर कामगिरी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, सहा. पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस अमंलदार रणजित पाटील, आयुब गडकरी, फिरोज बेग, चंदू नन्नवरे, आसिफ कलायगार, प्रशांत कांबळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील अमर वासूदेव यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या