Kolhapur Crime: कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) अचानक करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 53 सराईत गुन्हेगार हाती लागले. यामध्ये हद्दपार केलेल्या चार गुन्हेगारांचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहने, इसमांची तपासणी करणे, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्वाच्या वसाहतीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन रेकॉडवरील गुन्हेगारांना तसेच फरारी, हद्दपार केलेल्या आरोपींना चेक करणे बाबत आदेश जारी केले होते.


हद्दपार कारवाईतील तीन आरोपी सापडले


जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या एकुण 13 आरोपींपैकी तीन आरोपी हे बेकायदेशीर हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसून आले. अजित अनंतर नाडगौडा (रा. तीसरा बस स्टॉप, फुलेवाडी कोल्हापूर), धीरज राजेश शर्मा (रा. सांगलेकर यांचे घरी भाडयाने पाचगांव ता. करवीर), आणि नासीर कलंदर बागवान (रा. करूंदवाड ता. शिरोळ) यांच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच स्वप्नीन सुनिल घाटगे (रा. घर न. 60, बी वॉर्ड सुभाषनगर कोल्हापूर) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मर्यादित वेळेपेक्षा जास्त उशिरा सुरु असणाऱ्या अस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. तसेच अवैध धंद्यावरही सामूहिकपणे कारवाई करण्यात आली. 


एकूण 39 ठिकाणी नाकाबंदी


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur Police) एकूण 39 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये संशयित एकूण 1649 वाहनांची तपासणी करण्यात आली. 342 वाहनांवर मोटर वाहन कायद्यातंर्गत कारवाई करुन 1 लाख 1 हजार 430 रुपयांचा दंड आकारण्यात आला. मोटर वाहन कायद्याअंतर्गत 9 गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये एकुण 53 गुन्हेगार सापडले. तसेच बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या 21 जणांविरोधात कारवाई करुन 1 लाख 44 हजार 200 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.


पोलीस अधीक्षक स्वत: कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 


कोम्बिंग ऑपरेशनमध्ये (Kolhapur Police) पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित स्वत: होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, निकेश खाटमोडे- पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचेकडील अधिकारी अमंलदार असा एकूण 40 पोलीस अधिकारी 158 पोलीस अमंलदार, 209 होमगार्ड यांचा सहभाग होता.


इतर महत्वाच्या बातम्या