कोल्हापूर : जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज-आजरा मार्गावर दोन दिवसांपूर्वी हॉटेल बिग बॉससमोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती. या धडकेत मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर (वय 65) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.रहमान लमतुरे (वय 45 रा. आजरा) जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी कानडीकर यांचे उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजतात आजरा शहरात सर्वत्र हळद व्यक्त होत आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने दोघे जखमी 


दरम्यान, उस्मान कानडीकर आणि रहमान लमतुरे हे दोघेही दुचाकीने गडहिंग्लजला गेले होते. बुधवारी सायंकाळी ते आजऱ्याकडे परतत होते. अण्णा भाऊ आजरा सूतगिरणीजवळ एक गवा अचानक समोर येऊन त्यांच्या मोटारसायकलला धडकला. त्यामुळे दोघेही मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने ते जखमी झाले. कानडीकर यांना जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आजरा तालुक्यात गव्याच्या हल्याच्या घटना वाढल्या आहेत. 


दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने भक्ताचा करुण अंत


दुसरीकडे, मुंबईतून सुट्टी घेऊन गावी आलेल्या गणेशभक्ताचा  बाप्पाचे स्वागत करताना दारात पाय घसरून डोक्यावर पडल्याने करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यामध्येच बोलकेवाडीत घडली होती. सचिन शिवाजी सुतार (वय 38) असे दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे. दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.


नेमका प्रसंग काय घडला?


सचिन मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. पत्नी आणि मुलाला मुंबईत ठेवून ते गणेशोत्सवासाठी सोमवारी गावी आले होते. मंगळवारी बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा गणपती मित्र घेऊन आल्यानंतर दारात पोहोचले. गणपती स्वागत करून घरात घेण्यासाठी ते आईला हाक मारत धावत घरी गेले. त्यावेळीच त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.


इतर महत्वाच्या बातम्या