कोल्हापूर : शहरातील कसबा बावड्यात 10 ते 15 जणांच्या  गटाने पाठलाग करून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. सूरज बाळकृष्ण कांबळे (वय 24, रा. आंबेडकरनगर) आणि वैभव विश्‍वास माजगावकर ( वय 27, रा. गोळीबार मैदान) अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. बावड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ हा हल्ला झाला. जखमींवर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. जखमींनी संशयितांची नावे पोलिसांना दिली आहे. पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे.


पाठलाग करून कोयत्याने हल्ला 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आंबेडकरनगर परिसरातील आंबेडकर उद्यानात काही तरुणांची मारामारी केली होती. त्याठिकाणी सूरज कांबळे उभा होता. त्यावेळी सदर बाजारमधील चार ते पाचजण हातात चाकू, कोयत्यासह घेऊन उद्यानात आले. त्यांनी हल्ला करण्यासाठी सूरजकडे धाव घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाठलाग करून हल्ला करण्यात आला. सूरजच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर वार झाले आहेत. हल्ला होताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या वैभववरही हल्ला करण्यात आला. 


हल्ला करून हल्लेखोर पळाले


हल्ल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. दुचाकीवरून जखमींना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. सूरज कांबळेवर 5 ते 6 वार झाले आहेत. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वैभववर सुद्धा वार झालेत आहेत. 


भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण


दरम्यान, भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना गडहिंग्लज शहरात चार दिवसांपूर्वी घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोर ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे (वय 30, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या महिलेचं नाव आहे. भाजीपाला व्यवसाय करणारे पती लक्ष्मण शंकर नवलगुंदे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण आणि त्यांची पत्नी लता दोघे मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात.


आठवडी बाजारासाठी ते पहाटेच भाजीपाला घेऊन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक नातेवाईक महिलाही भाजी घेऊन आली होती. दोघे पती पत्नी दोन ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी बसले होते. पती लक्ष्मण नगरपरिषद आवारात भाजीपाला विकत होते, तर पत्नी होळकर चौकात भाजीपाला विकत होती. यावेळी त्यांच्यासोबत आलेली नातेवाईक महिला लघुशंकेला बाजूला गेल्यानंतर तोंड बांधून आलेल्या दोघा अज्ञातांनी लताला जबरदस्तीने ओमनी गाडीत घालून फरार झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या