Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur news) पन्हाळ्यामध्ये (Panhala) बिबट्याने शनिवारी मध्यरात्री घुसून दोन कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांनी एकाचवेळी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. कुत्र्यांनी प्रतिकार करताना आवाज आल्याने बंगल्याचे मालक डॉ. राज होळकर यांनी लाईट लावल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. होळकर यांचा तबक उद्यानाच्या बाजूला बंगला आहे. या बंगल्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. दोन वर्षापूर्वी सुद्धा बिबट्याने या बंगल्यात प्रवेश केला होता. त्यांच्या आजवर अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्याने केली आहे. मध्यरात्री एक वाजून 28 मिनिटांनी बिबट्याने डॉ. होळकर यांच्या बंगल्यात घरात शिरून दोन कुत्र्यांवर हल्ला केला. परंतु डॅंगो नावाच्या पाळीव कुत्र्याने त्याला प्रतिकार केला. डॉ. होळकर यांना याची चाहूल लागताच लाईट लावून ते बाहेर आल्यामुळे बिबट्या पळून गेला.
ज्या कुत्र्याने प्रतिकार केला त्या कुत्र्यावरही बिबट्याने आतापर्यंत चारवेळा हल्ला केला आहे. मात्र, आजपर्यंत त्याने प्रतिकार करत बिबट्याच्या तावडीतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याच ठिकाणी असलेली कुत्री बिबट्याचा मागून गेल्याने तिची शिकार केली असण्याची शक्यता आहे. कुत्री बंगल्यातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला पळाल्यानंतर मागून बिबट्याही मागून गेल्याचे दिसते. त्यामुळे, तिची शिकार झाली असण्याची शक्यता आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
दुसरीकडे 17 जून रोजी शाहूवाडी तालुक्यातील सरुडमधील बिरदेव माळ परिसरात बिबट्याने जनावरांच्या वस्तीवरील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक कुत्रा ठार झाला तर एक कुत्रा जखमी झाला. वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांनी आरडओरड केल्यानंतर या बिबट्याने आपली शिकार तेथेच टाकून शेजारील उसाच्या शेतातून धूम ठोकली. अन्य एका घटनेत हारुगडेवाडी पैकी गुळवणेवाडीत (ता. शाहूवाडी) कॅनॉलशेजारी असणाऱ्या राम लक्ष्मण सावंत यांच्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता. ग्रामस्थांनी धाडसाने या बिबट्याला काठीने हुसकावून लावले. दोनवडे (ता.करवीर) येथे एका वाहन चालकाला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या