कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकलंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे आज (15 एप्रिल) जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. 


शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार


उमेदवारी अर्ज भरण्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन महायुतीकडून केलं जाणार आहे. दरम्यान, कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख 70 हजारांनी विजयी झालो झालो होतो, असे सांगत कदाचित मी हे लीड ओलांडून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मंडलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, हे काही शक्ती प्रदर्शन नाही, तर या ठिकाणी महायुतीची शक्ती आहे आणि ते नेते पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रचाराचे नियोजन केले जात असून गावोगावी तसेच घरोघरी कार्यकर्ते कसे पोहोचतील याचे नियोजन होणार आहे. त्याची सुरुवात केली असल्याचे संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले.



राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 


त्यांनी सांगितले की विजयाची नक्की हमी आहे. मात्र, लीड काही सांगू शकत नाही. मात्र, आता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गेल्यावेळच्या तुलनेत लीड ओलांडून मी विजयी होईन, असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांचाही उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. शेट्टी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच मी एकटा नाही दाखवण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या