Shahu Maharaj: कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता तो लागला, पण आपण पुसून टाकू. दंगल केवळ कोल्हापुरात नाही संभाजीनगरमध्ये घडली, अहिल्यानगरमध्येही झाली. नाशिकमध्येही काही तरी घडलं. कोल्हापूरला तर टार्गेट केल आहे. मात्र, ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार शिव शाहू सद्भावना रॅलीनंतर झालेल्या सभेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.
राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीनंतर झालेल्या सभेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपले परखड मत व्यक्त करताना गेल्या 100 वर्षात कोल्हापूरला डाग लागला नाही तो 7 जून रोजी लागल्याचे म्हणाले.
कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता
शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता तो लागला, पण तो आपण पुसून टाकू. 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याच दिवशी स्टेट्स प्रकरण घडले. पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले. ती मुलं अल्पवयीन होती. मात्र, त्यांना माफ करता येतं नाही आणि त्यांच्या पालकांनाही माफ करता येतं नाही. कारण त्यांनी त्या मुलांना योग्य संस्कार केले नाहीत. तसेच आणि कोणी त्यांना स्टेटस ठेवायला लावले का? याचाही तपास झाला पाहिजे. मात्र, त्यानंतरही काही तरुणांनी सर्व लोकांना जबाबदार धरले. दुसऱ्या दिवशी जर सतर्क राहिले असते, तर घडले नसते. मात्र, कोल्हापूरला लागलेला हा डाग आपण लवकरात लवकर पुसून टाकू आणि आपण लवकरात सुखाने नांदू.
समतेचा विचार पुढे नेऊया
त्यांनी पुढे सांगितले की, मात्र जी मंडळी अशा वातावरणाला खतपाणी घालतात त्यांच्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. कोल्हापुरात सातत्याने एकोप्यचे वातावरण राहिलं आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात मानवता, समतेचं वातावरण निर्माण केलेलं वातावरण बिघडू पाहतात. त्यामुळे काही युवक दिशाभूल झाले होते. मात्र, ते युवक आता रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने येणार नाहीत. त्यांना इतिहास समजला असेल. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यसोबतही एकत्र आहेत. युवकांना चुकीचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे हे घडते. यासाठी चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून नेत्यांनी लक्ष ठेवणे गरजेचं आहे. हा सलोख्याचा विचार देशभर पोहचला पाहिजे कारण जे कोल्हापुरात घडतं ते सर्वत्र घडतं. समतेचा विचार पुढे नेऊया आणि कृतीतून तो पुढे नेला पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या