कोल्हापूर : ॲड. उज्वल निकम हे  निर्भीड आणि प्रामाणिक कायदेज्ज्ञ असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. हसन मुश्रीफ यांचे बंधू समशुद्दीन मुश्रीफ यांच्या 'हु किल्ड करकरे?' पुस्तकावरून आरोप प्रत्यारोप  सुरु असतानाच हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ॲड. उज्वल निकम हे  निर्भीड आणि प्रामाणिक कायदेतज्ञ आहेत. त्यांना विजयी करणे हे लोकसभेच्या दृष्टीने चांगले होईल. हसन मुश्रीफ हे समशुद्दीन मुश्रीफ यांचे बंधू आहेत. 


उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे 


दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी समशुद्दीन मुश्रीफ यांनी उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांचे त्यांनी समर्थन केलं आहे. समशुद्दीन मुश्रीफ म्हणाले की, मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. 


त्यांनी सांगितले की, मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत इतकी माहिती माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही मुंबई पोलिस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. मात्र, खटला सुरू झाल्यानंतर आरएसएस आणि उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला आहे. 


उज्वल निकम हे या सगळ्या बाबींसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या