Kolhapur Crime : पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडित महिलेची सुटका केली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बालिंगा परिसरात एका घरातच वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत वेशा अड्डा चालवल्याचे समोर आले. पीडित महिला आणि तिचा पती दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घर भाड्याने घेऊन गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे घरमालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बडकवडे यांनी केलं आहे. भाडेकरु ठेवताना ओळखपत्र, मोबाईल नंबर घ्यावे, त्यांच्या नातेवाईकांची माहिती घ्यावी, भाडे करार करावा, शेजाऱ्यांना भाडेकरुंची कल्पना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दोन महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून दोघा तरुणांना अटक केली होती. एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ रोडवर कंदलगाव हद्दीत एका रेस्टॉरंटमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.
अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार करुन सात लाखांची खंडणी उकळली
दुसरीकडे, जबरदस्तीने वेश्या व्यवसायास जुंपलेल्या बांगलादेशी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) या संशयितास अटक करण्यात आली होती. त्याला निलंबित करण्यात आलं आहे. स्वप्नील कोळी कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीसह सात लाखांच्या खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सतरा वर्षीय पीडितेची फिर्याद घेतली. त्यामध्ये म्हटले आहे की, मूळची बांगलादेशी असलेली ही मुलगी जानेवारी 2022 पासून सांगलीत स्वरुप चित्रमंदिराजवळील वस्तीत या मुलीला एका महिलेने व्यवसायासाठी आणले होते. हवालदार कोळीने पीडितेवर गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.
इतर महत्वाच्या बातम्या