Pune By-Poll Election Results 2023 LIVE Updates Sanjay Raut In Kolhapur : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची (PuneBypollElectionResults2023) आज मतमोजणी होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये कसब्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. दुसरीकडे चिंचवड मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. त्यामुळे या निकालावरून कोण विजयी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


क्षणाक्षणाला निकाल बदलत असल्याने याची उत्सुकता आता शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या समोर आलेल्या पहिल्या नऊ फेरींच्या निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला. कसब्यात भाजपचा विजय हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिंबाने राहिल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. ते म्हणाले की, आज शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक आहे त्याचा परिणाम आता कसब्यामध्ये दिसून येत आहे.  


Pune By-Poll Election Results 2023 LIVE Updates


यावरून महाविकास आघाडी किती मजबूतीने पुढे जात आहे याचे कसबा उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजप नेहमीच निवडून आला आणि कसब्यातील विषय हा फक्त शिवसेनेच्या पाठिंबानेच होत होता. आता मात्र महाविकास आघाडी एकत्र असल्याने त्याचे परिणाम दिसून येत आहे. संजय राऊत यांनी मुक्ता टिळक तसेच लक्ष्मण जगताप त्याचबरोबर गिरीश बापट यांना आजारी निवडणुकीत भाजपकडून सातत्याने उतरवण्यात आल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी मुक्ता टिळकांना दोन-तीन वेळा आणलं, लक्ष्मण जगताप यांना सुद्धा आणलं, गिरीश बापटांना सुद्धा आणलं. ते काही जरी म्हणत असली, तरी हे अमानुष राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की लोकांना हे आवडत नाही. कसब्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच त्यांच्या मंत्रिमंडाने पोलिसांच्या मदतीने कॅम्प लावला होता, असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला. ते पुढे म्हणाले की चिंचवडमध्ये देखील शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याच्या राहणार नाही. 


दरम्यान, आज कोल्हापूर दौऱ्याचा संजय राऊत यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये त्यांचे आज दोन मिळावे पार पडणार आहेत. यामध्ये एक मेळावा इचलकरंजीमध्ये होत असून दुसरा मेळावा शाहूवाडी तालुक्यातील सरुड या ठिकाणी होत आहे. या दोन मेळाव्यानंतर ते आज कोल्हापूरमध्ये मुक्कामी राहून उद्या ते सांगलीसाठी प्रयाण करतील. काल झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्थानिक आमदार संजय मंडलिक तसे धैर्यशील माने यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी चंद्रदी नरके यांच्यावरही निशाणा साधला होता.


इतर महत्वाच्या बातम्या