Sanjay Raut In Kolhapur : बाळासाहेब, मातोश्रीशी कुणी गद्दारी केल्यास आम्ही वेडे आहोत, शिवसेना नावाचा तेजस्वी सूर्य कुणाला झाकता येणार नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निर्धार बोलून दाखवला. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. गद्दारांच्या छाताडावर नाचून शिवसेनेचा ध्वज फडकवा, अशी शिवगर्जना त्यांनी मेळाव्यात केली.
कोल्हापुरात आल्यानंतर चोरमंडळ शब्दप्रयोग केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे हक्कभंगावरून अडचणीत आल्यानंतर संजय राऊत मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी आपला निर्धार कायम ठेवताना शिंदे गटावर तोफ डागली. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना संपवण्याचे काम दिल्लीश्वरांनी शिवसेनेमधील गद्दारांना सोबत घेऊन केलं आहे. शिवसेना नावाची काहींना अॅलर्जी आहे. बाळासाहेब, मातोश्रीशी कोणी गद्दारी केल्यास आम्ही वेडे आहोत. शिवसेना नावाचा तेजस्वी सूर्य कुणाला झाकता येणार नाही. पावसाळ्यातील ही गांडूळ आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबई, महाराष्ट्र वाचला. ते म्हणाले, सगळेच चोर मंडळ झालं आहे. अधिवेशन माझ्या नावाने बंद पडले. हे चोर आमच्या तिकीटवर निवडून आले. हरामखोर म्हटलं, तर आता पुन्हा खटला दाखल होईल. 40 लोकांनी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा.
आमची जिद्द कशी चोरणार?
त्यांनी सांगितले की, मला धमकावून मी पक्ष सोडेन असे कुणाला वाटत असेल, तर मी मरेन पण ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही. तुम्ही शिवसेना नावावर दरोडा टाकला पण आमची जिद्द कशी चोरणार? भाजपला सत्तेचे दरवाजे बाळासाहेब ठाकरे यांनी उघडून दिले. या लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्य आत्म्याचा शाप लागेल. तुमच्या बापाची आहे का शिवसेना? अशी विचारणा त्यांनी केली. अधिक ताकदीने शिवसेना उभी राहत आहे. शिवसैनिकांची गर्जना दाखवायसाठी ही यात्रा आहे. जे डरपोक होते ते पळून गेले.
इतर महत्वाच्या बातम्या