Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीत सावकार कलाप्पा देबाजी (वय 35) या मेंढपाळाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर बीपीड कॉलेज इमारतीजवळ एका शेतातील झुडपात मृतदेह आढळून आला होता. खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, पोलिसांनी या खुनाचा 24 तासांमध्ये उलगडा केला आहे. अनैतिक संबंधाच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी पोलिसांनी माळाप्पा कयप्पा हेगण्णावार (वय 25, रा. हेगण्णावार कोडी, नागराळे, ता. चिकोडी, जि. बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पत्नीकडे वारंवार अनैतिक संबंधासाठी तगादा
पोलिसांनी माळाप्पाला खुनानंतर अवघ्या 24 तासांमध्ये नागराळेमधील नातेवाईकांच्या घरातून अटक केली. संशयित आरोपी माळाप्पा हा मांत्रिक आहे. मयत सावकार देबाजी हा माळाप्पाच्या पत्नीकडे अनैतिक संबंधांसाठी वारंवार तगादा लावला होता. त्यामुळे चिडलेल्या माळाप्पाने लिंबू उतरून टाकण्याचा बहाणा करून बोलवून घेतल्यानंतर हात पाय बांधून कुऱ्हाडीने वार करून माळाप्पाचा खून केल्याची माहिती त्याने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बाळाजी त्याच्या पत्नीकडे वारंवार अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता.
उचगाव कृषी महाविद्यालयाच्या शेतवडीत कामगाराचा निर्घृण खून
दरम्यान, आज करवीर तालुक्यातील उचगाव कृषी महाविद्यालयाच्या शेतवडीत कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. आज (20 एप्रिल) सकाळी माॅर्निंग वाॅकला गेलेल्यांना मृतदेह दिसून आल्यानंतर पोलिस पाटलांना माहिती दिल्याने ही घटना समोर आली. गणेश नामदेव संकपाळ (वय 47, रा. गणेश काॅलनी, उचगाव) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणातून झाला? याबाबत माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. मयत गणेश हा एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता. हा परिसर निर्जन असल्याने अनेकजण उघड्यावर मद्यप्राशनासाठी येत असतात. त्यामुळे पोलिसांनी शक्यता गृहित तपास सुरु केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या