Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Crime) गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. बंद फ्लॅट, घरे, मॉर्निंग वाॅकला गेलेल्या महिला चोरट्यांचे टार्गेट होत आहेत. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात दोन मंगळसूत्र लंपास केल्याच्या घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या. हातकणंगले तालुक्यात घर बंद असल्याचा डाव साधत मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीच्या घटना वाढतच चालल्यानं नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 


तारदाळमध्ये पाऊण लाखांचा मुद्देमाल पळवला


हातकणंगले तालुक्यातील तारदाळमध्ये लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांचे घर फोडून चोरट्यांनी 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत विशाल आनंद गुरव यांनी फिर्याद दिली आहे. लहान भावाचे लग्नकार्य गुरव सहकुटुंब बेळगाव येथे गेले होते. 13 फेब्रुवारीपासून घरातील सर्वजण बाहेरगावी असल्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांचे घर फोडले. लग्न समारंभ आटोपून घरी परतताच घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. 


जयसिंगपुरात मंगळसूत्र  केले लंपास 


जयसिंगपुरात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी जयश्री दीपक लंगरे यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळवून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दुसरीकडे, शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथील महिला मॉर्निंग वॉकला गेली असता अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून नेले. सुरेखा दगडू शिंदे शिंगे या गुरुवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. यावेळी एक अज्ञात इसम पाठीमागून येऊन मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून तोडून काढून घेतले व पुढे काही अंतरावर उभे असलेल्या मोटरसायकलवरील दुसऱ्या साथीदारासह पळून गेला. शिंगे यांनी शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.


गहहिंग्लजमध्ये भरदिवसा घरात चोरी 


दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लजमध्ये सुभेदार सुनील साळवी यांचा फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडत 16 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. शहरातील डॉक्टर कॉलनीतील मगदूम गल्लीतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला होता. सुभेदार साळवी रजा संपवून आठवड्यापूर्वीच सैन्यदलातील कर्तव्यावर हजर झाले आहेत. त्यांच्या पत्नी शुभांगी वीज बील भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची दोन्ही मुले क्लासला गेली होती. नंतर मुलं पहिल्यांदा घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यानंतर शुंभागी सुद्धा आल्या. त्यांनी बेडरुममध्ये पाहणी केली असत तिजोरीचा दरवाजाही उचकटल्याचे दिसले. सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचेही निदर्शनास आले.एकूण 16 तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे शुंभागी साळवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या