Kolhapur Crimeपत्नी, मुलगा आणि मुलीला कालव्यात ढकलून पतीने स्वतः कर्नाटकात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक कोल्हापुरात (Kolhapur Crime) प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये मुलगी बचावली असून तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला पोहता येत असल्याने जीव वाचला. स्थानिकांनी तिला आधार दिला. कालव्यात ढकलून दिल्याने राजश्री संदीप पाटील (वय 32) व सन्मित संदीप पाटील (वय 8 दोघेही रा. हलसवडे, ता. करवीर) यांचा बुडून मृत्यू झाला. मुलगी श्रेया (14) हिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत.  जखमी अवस्थेत असलेल्या मुलीने माहिती दिली. मात्र, ती भेदरलेली असल्याने आजही तिच्याकडून पोलिस आज सविस्तर माहिती घेणार आहेत. आईसह मला आणि माझ्या भावाला वडिलांनी कालव्यात ढकलून दिल्याचा जबाब मुलीने ‘सीपीआर’मध्ये उपचार घेत असताना दिला. 


मुलगी पोहून काठावर आली 


दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा पती संदीप यानेही भोज (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरगुती कारणावरून खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबीय करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे आहे. संदीपचा डॉल्बी साउंड सिस्टिमचा व्यवसाय होता. वडिलांना संदीपने हलसवडे येथील शाळेतून मुलगी आणि मुलाला बँकेत जाणार असल्याचे सांगत गाडीवर घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नीलाही घेऊन बाहेर पडले.


दुपारी एकच्या सुमारास कालव्यातील कठड्यावर एक मुलगी मदतीची याचना करताना दिसल्याने स्थानिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी तत्काळ जखमी झालेल्या मुलीला कसबा सांगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. स्थानिकांनी विचारणा केल्यानंतर मी पोहता येत असल्याने बाहेर आले. वडील, आई आणि लहान भाऊ पाण्यात पडल्याचे सांगितले. ही घटना समजताच कालवा परिसरात मोठी गर्दी झाली. सायंकाळी पाणबुडीच्या सहाय्याने शोधमोहीम केल्यानंतर पोलिसांना राजश्री आणि सन्मितचा मृतदेह मिळाला. 


कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच


कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात (Kolhapur News) अत्यंत भयाण पद्धतीने  आयुष्याच्या शेवट करण्याच्या घटना (Kolhapur Crime) सलग घडत आहेत. कधी विष प्राशन, कधी पंचगंगा नदीत उडी, कधी रुग्णालयाच्या इमारतीतून उडी अशा भयानक मार्गाने जीवन संपवण्याच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं असतानाच अत्यंत भयानक घटना इचलकरंजीत घडली. अवघं 31 वय असलेल्या व्यावसायिकाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येसाठी निवडलेला मार्ग पाहून अंगावर शहारे आले होते.


इतर महत्वाच्या बातम्या