Kolhapur Crime : कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात (Kolhapur News) अत्यंत भयाण पद्धतीने चिमूटभर आयुष्याच्या शेवट करण्याच्या घटना (Kolhapur Crime) सलग घडत आहेत. कधी विष प्राशन, कधी पंचगंगा नदीत उडी, कधी रुग्णालयाच्या इमारतीतून उडी अशा भयानक मार्गाने जीवन संपवण्याच्या घटनांनी (Series of Suicides continues in Kolhapur district) कोल्हापूर हादरलं असतानाच अत्यंत भयानक घटना इचलकरंजीत घडली. अवघं 31 वय असलेल्या व्यावसायिकाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येसाठी निवडलेला मार्ग पाहून अंगावर शहारे आले आहेत. 


तोंडात बोळा घालून स्वत:च्या हाताने गळा चिरुन आत्महत्या


इचलकरंजीत स्वतःच्या हाताने चाकूने गळा चिरुन बेकरी व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राकेश उर्फ सूरज सुभाष कुडचे (रा. कुडचे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले, तरी नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. राकेशने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन किसान चौक परिसरात बेकरी साहित्य विक्रीचे दुकान सुरु केले होते. रविवारी नेहमीप्रमाणे बेकरी उघडल्यानंतर त्याने दुपारी शटर बंद करुन घेतले होते. सायंकाळपर्यंत शटर न उघडल्याने ग्राहकांनी चौकशी केली.


मात्र, बेकरीच्या गाळ्यातील बल्बचा प्रकाश दिसत असल्याने पाहिले असता गंभीर अवस्थेत राकेश दिसून आला. त्यामुळे शटर उचकटून नातेवाईक आणि नागरिकांनी दुकानाचे शटर उचकटून प्रवेश केला. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. गाळ्यातील प्रसंग पाहून पहिल्यांदा खून झाला असावा, अशी शंका आली. मात्र, दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर मात्र राकेशने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:ला संपवल्याचे समोर आले. धारदार चाकू तसेच कात्रीने मानेवर आणि गळ्यावर त्याने वार करुन घेतले. बाहेर आवाज येऊ नये, यासाठी राकेशने तोंडात बोळा घेत आत्महत्या केली.  


कोल्हापुरात आत्महत्यांची मालिका 


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात सलग आत्महत्यांची मालिकाच (series of suicides continues in Kolhapur district) सुरु आहे. करवीर तालुक्यातील वाकरेत दीड महिन्यात चार तरुणांनी आत्महत्या केल्याने सन्नाटा पसरला. मागील आठवड्यात आजाराला कंटाळून एकाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आजाराला कंटाळून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेऊन जयसिंग नामदेव कणसे (वय 48 वर्षे, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) यांनी आत्महत्या केली. गडहिंग्लज तालुक्यात शिक्षकानेही आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली. 


मागील आठवड्यात कोल्हापूर शहराच्या उपनगरात एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. यामध्ये एका विशीतील तरुणाचा समावेश होता. पाचगाव, आर. के. नगर परिसरातील दीपक करमचंद रयत (वय 50 वर्षे, गणेश नगर, रुमाले माळ) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. तेजस प्रशांत यादव (वय 19 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. हातकणंगले तालुक्यातील नागावात नुरमहमंद साहेबजी मुल्लाणी (वय 42 वर्षे, रा. धनगर गल्ली) यांनीही राहत्या घरी आत्महत्या केली.


दुर्दैवाच्या फेरा म्हणजे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सलग आत्महत्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. तरुणींकडूनही आत्महत्या होत असल्याने समाजमन सुन्न होत चालले आहे. आयुष्यही न पाहिलेल्या 20 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींच्या आत्महत्या चिंतातूर करणाऱ्या होत चालल्या आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या