कोल्हापूर : दारुच्या नशेत भरधाव आलिशान कारचालकाने टेम्पोला धडक दिल्याने दोन महिला गंभीर झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडली. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघातानंतर आलीशान कार चालक फरार झाला. कोल्हापुरात फुलेवाडी रिंग रोडवर ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

फुलेवाडी रिंग रोडवर टेम्पो जात होता. टेम्पोमध्ये दोन महिला होत्या. यावेळी समोरून आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील आलिशान कारचालकाने भरधाव वेगात टेम्पोला थेट धडक दिली. या धडकेत कार जाग्यावर फिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. कारने धडक दिल्याने टेम्पोमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोला धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेमधील कारचालक फरार झाला. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

वृध्द महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

दरम्यान, दिंडनेर्ली(ता.करवीर) येथे शेतात गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गंगुबाई दत्तात्रय वाडकर (वय ६४, रा. हणबरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. इस्पूर्ली पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. गंगुबाई वाडकर या शेती कामात मदत करण्यासाठी आल्या होत्या. भात भांगलण करण्यासाठी त्या एकट्या पुढे गेल्या होत्या. शेतातील विद्युत पुरवठा करणारी तार तुटून भातात पडली होती. गंगुबाई यांच्या पायांना या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका शेतकऱ्याला वृध्द महिला शेतात निपचीत पडल्याचे दिसले. उठवायला जाणार इतक्यात त्याला विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

पाय घसरुन युवक कृष्णा नदीत बुडाला

अन्य एका घटनेत गणेशमूर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यावरुन पाय घसरून कृष्णा नदी पात्रात पडल्याने गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. विनायक रुकमना आवटी (वय 39) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास राजापूर बंधाऱ्यावर ही घटना घडली. गावातील मंडळाची विसर्जन मिरवणूक होती. मिरवणूक संपवून राजापूर बंधाऱ्यावर विसर्जन करताना गणेशमुर्ती बरोबर तोल जावून विनायक व तमन्ना तोडकर दोघेही पात्रात पडले. तोडकरला पोहता येत असल्याने तो सुखरूप बाहेर आला. मात्र विनायकला पोहता येत असतानाही दम भरल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या