Western Maharashtra Ganpati Visarjan 2023 Live : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी रंग भरला, सातारमध्ये पावसाची हजेरी; सांगलीमध्येही उत्साह टिपेला

Kolhapur Sangli Satara Ganpati Visarjan Miravnuk latest news : कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा आणि सांगली जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Sep 2023 06:59 PM
साताऱ्यातील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ 


साताऱ्यातील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ 


Satara Ganesh Darshan : सातारा शहरातील मानाचे पहिला गणपती आझाद मंडळ, जयहिंद गणोत्सव मंडळ, गुरूवार तालीम, अजिंक्य गणेशोत्सव, जय जवान गणेशोत्सव, शंकर पार्वती आहेत.सातारा जिल्ह्याचे पालाकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. पाहणी करत असाताना ज्या ठिकाणी कृत्रिम तळी तयार करण्यात आली आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाहणी केली. हा दौरा त्यांनी मोटरसायकलवर बसून केला. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख आणि जिल्हाधिकारीही सोबत होते. सातारा जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

केरळच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरातील मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले 



केरळच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरातील मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले 


Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात पावसाच्या रिमझिममध्ये गणेश विसर्जनाची धूम सुरु आहे. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी चांगलाच रंग भरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीमध्ये केरळच्या पारंपरिक वाद्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धनेर्लीत एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्याला पथकाला आमंत्रित केलं आहे. 

भर पावसात साताऱ्यात गणपती विसर्जन सुरू; मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल


भर पावसात सातारा शहरात गणपती विसर्जन सुरू


Satara Ganesh Darshan : साताऱ्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनाला सुरवात झाली आहे. साताऱ्यात गणेश विसर्जनाला पावसाने हजेरी लावली आहे. साताऱ्यात 1 लाख 11 हजार घरगुती गणपती आहेत. साताऱ्यात विविध ठिकाणी कृत्रिम तळे उभारण्यात आली आहेत. विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

कोल्हापुरात बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाचा ठेका



कोल्हापुरात बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाचा ठेका


Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात सकाळपासून गणेश मिरवणुकीत ढोल पथकांनी वातावरण निर्मिती केली आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला. 

'मेबॅक' कारमधील बॅनर्समधून कोल्हापूर शहराच्या दुखण्यांवर थेट भाष्य



'मेबॅक' कारमधील बॅनर्समधून कोल्हापूर शहराच्या दुखण्यांवर थेट भाष्य


कोल्हापूर : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीस थाटात प्रारंभ झाला आहे. मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आजवर आपल्या मिरवणुकीत सातत्याने कोल्हापूरच्या दुखण्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या मिरवणुकीत मंडळाची अग्रभागी असलेली मेबॅक कारने चांगलेच लक्ष वेधले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोकपणे बॅनर्सच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी? विचारणा करण्यात येत आहे.


काय म्हटलं आहे बॅनर्समध्ये?


काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी समदं ओके नाही कोल्हापूर. काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीसमोर मेबॅक कार मार्गस्थ झाली असून कोल्हापूरचे प्रश्न घेऊन जात असताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सांगली : मिरजेत गणरायाच्या विसर्जन मार्गावर भव्य स्वागत कमानी सज्ज



सांगली : मिरजेत गणरायाच्या विसर्जन मार्गावर भव्य स्वागत कमानी सज्ज


Sangli Ganesh Darshan : सांगलीत मिरज शहरामध्ये स्वागत कमान उभारण्याची परंपरा कायम आहे. गेल्या 40 वर्षांपासून विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य स्वागत कमान उभारल्या गेल्या आहेत. यंदा राम मंदिर ,छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, महिलांचा आदर करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातील प्रसंग अश्या वेगवेगळ्या प्रतिकृती स्वागत कमानीवर साकारण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरज शहरातल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी स्वागत कमानी उभारण्याची ही परंपरा आहे. स्वागत कमानीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देखील देण्याची परंपरा आहे.

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाचा पहिला गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ


Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाचा पहिला गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ 


कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर शहरातील पहिला मानाची गणपती म्हणून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीला मान आहे. विसर्जन मिरणवुकीत हा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरु होते. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.




पार्श्वभूमी

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापुरात (Kolhapur Sangli Satara Ganpati Visarjan Miravnuk latest news) आज गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. चांद्रयान मोहिम, सूर्याच्या अभ्यासासाठी नुकतीच करण्यात आलेली आदित्य एल 1 मोहिम विसर्जन मिरवणुकीत आकर्षण असणार आहे. पारंपरिक वाद्ये, लेझर लाईट, डीजे सुद्धा मिरवणुकीत असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत धनगरी ढोलही आकर्षण असणार आहेत. एलईडी स्क्रीनही विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. 


इराणी खणीमध्येच विसर्जन होणार 


सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच होणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. महापालिकेलाही सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मार्गावर 66 सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.  विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असणार आहे.  त्यामुळे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर सन्नाटा असणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास  गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. रात्री बारानंतर साउंड सिस्टीम किंवा पारंपरिक वाद्ये सुद्धा बंद करावी लागणार आहेत. अशी वाद्ये किंवा साउंड सिस्टीम सुरू ठेवल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत. मंडळाच्या अध्यक्षांसह वाद्ये किंवा सिस्टीम मालकांवरही गुन्हा दाखल होणार आहे. 


बससेवा बंद  


अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने सर्व मार्गांवर केएमटी बससेवा तसेच सवलत पास वितरण केंद्र बंद राहणार आहेत. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक ज्याप्रमाणे सुरू होईल, त्यानुसार बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केएमटीकडून देण्यात आली.


विसर्जन मिरवणुकीचा मार्ग


उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई चौक, दिलबहार चौक, टेंबे रोड, खाँ साहेब पुतळा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश चौक, रंकाळा स्टँड, जावळाचा गणपती चौक, राज कपूर पुतळा, इराणी खण 


समांतर मार्ग कसा असेल 


उमा टाकी चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रप शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी,  गंगावेश, इराणी खण  


पर्यायी मार्ग कसा असेल 


उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, यल्लमा मंदिर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरा सागर हॉल, सुधाकर जोशी नगर, चौक देवकर पाणंद, क्रशर चौक, इराणी खण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.