कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच नाव आहे. दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं. दरम्यान, विषारी औषध प्राशन करण्यामाील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
आर्या खाडे या शालेय विद्यार्थ्यींनीनं दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करताना विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. थोड्या वेळानं तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आर्याचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या मैत्रिणीना धक्काच बसला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण (वय 25, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी गेल्यावर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली.
इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक कली.
लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून; अट्टल गुन्हेगाराचा चार तासात माग काढला
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले (Hatkanagle) तालुक्यात एकतर्फी प्रेमातून अट्टल गुन्हेगार असलेल्या नराधमाने 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील वठार तर्फ वडगावमध्ये उघडकीस आली. यानंतर पेठवडगाव पोलिसांनी अवघ्या चार तासात प्रकरणाचा छडा लावत सनी अरुण कांबळे (वय 25, सध्या रा. सम्राट अशोकनगर, वाठार तर्फ वडगाव) याला अटक केली. एकतर्फी प्रेमातून त्रास सुरु केल्यानतंर सनीला पीडित तरुणी व त्याच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले होते. पीडित तरुणीशी सनीचा वाद सुरु असल्याने चर्चा करण्याचे असल्याचे सांगत ओढ्याजवळील शेतात नेले. यावेळी नराधम आरोपी सनीने लैंगिक अत्याचार केला. पीडिताने विरोध केल्यानंतर विरोधाला न जुमानता लैंगिक अत्याचार करत खून केला.
इतर महत्वाच्या बातम्या