कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur News) एकमेकांचे वैरी झालेल्या खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज (21 ऑक्टोबर) एकाचवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या बाजूला बसून कोल्हापुरी फेटा (Kolhapuri Pheta) बांधून घेतला. कृषी विभागाचे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी बऱ्याच कालावधीनंतर दोन्ही नेते कृषी विभागाच्या कार्यक्रमात दोघेजण एकत्र आले. 



शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार


यावेळी बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही दोघं एकत्र असल्याची संधी साधत हळूच चिमटा काढला. ते म्हणाले की, मी ज्या ज्या ठिकाणी असेन तिथं हे दोघे एकत्र असतील. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार आहे. मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना निवडणुकीसाठी वेगळ्या वाटा असल्याचे स्पष्ट केले. 


शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा


दरम्यान, शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेन, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. दुसरीकडे, चार दिवसांपूर्वीच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर (Kolhapur Loksabha) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून (Congress) दावा करण्यात आला आहे. असे असतानाच आता शरद पवार गटाकडूनही (Sharad Pawar) दावा करण्यात आला आहे.


कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांकडे एकमुखाने मागणी पदाधिकऱ्यांकडून करण्यात आली. तर हातकणंगलेमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी घेतली. 


इतर महत्वाच्या बातम्या