हातकणंगले (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले (Hatkanagle) तालुक्यात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून अट्टल गुन्हेगार असलेल्या नराधमाने 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील वठार तर्फ वडगावमध्ये उघडकीस आली. रविवारी संध्याकाळी पोत्यात गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह आढळला. यानंतर पेठवडगाव पोलिसांनी अवघ्या चार तासात प्रकरणाचा छडा लावत सनी अरुण कांबळे (वय 25, सध्या रा. सम्राट अशोकनगर, वाठार तर्फ वडगाव) याला अटक केली.


दीड वर्षांपासून एकतर्फी प्रेमातून त्रास 


दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सनी कांबळे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. तो गेल्या दीड वर्षांपासून संबंधित तरुणीला त्रास देत होता. खून झालेली तरुणी नांदेड जिल्ह्यातील आहे. तिचे आई-वडील वाठारमध्ये वीटभट्टीवर मजूर आहेत. पीडिता एका फूटवेअरच्या दुकानात कामाला होती. एका गरीब कुटुंबातील असलेल्या पीडिताला नराधम सनी दीड वर्षांपासून एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता.


लैंगिक अत्याचार करुन खून


एकतर्फी प्रेमातून त्रास सुरु केल्यानतंर सनीला पीडित तरुणी व त्याच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले होते. पीडित तरुणीशी सनीचा वाद सुरु असल्याने चर्चा करण्याचे असल्याचे सांगत ओढ्याजवळील शेतात नेले. यावेळी नराधम आरोपी सनीने लैंगिक अत्याचार केला. पीडिताने विरोध केल्यानंतर विरोधाला न जुमानता लैंगिक अत्याचार करत खून केला. तरुणी मृत झाल्याचे लक्षात येताच तो फरार झाला व काही झालेच नाही, अशा अविर्भावात वावरत होता. 


पीडितेवर अमानुष व क्रूरपणे लैंगिक अत्याचार 


मृतदेह सापडल्यानंतर  बेपत्ता तरुणीचा शोध सुरु असतानाच सर्व शक्यतांचा विचार करून पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित केले. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी कांबळेचं नाव तपासात समोर आले. पोलिसांनी संशयावरून सनी कांबळेला ताब्यात घेतले.  त्याने एकतर्फी प्रेमातून पीडितावर अमानुष व क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला व तिचा गळा आवळून खून केला. पीडिताच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर कांबळेला बेड्या ठोकण्यात आला. सनी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. छान छौकीत राहून व्यसनासाठी पैसे उकळत होता. पीडिताबरोबर ओळखीतून संबंध ठेवण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. यातून भांडणदेखील झाले होते. परगावातील असल्यामुळे भीतीमुळे मृत मुलगी याबाबत फारशी बोलत नव्हती.


इतर महत्वाच्या बातम्या