Kolhapur Bajar Samiti : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने खाते खोलले असून 5 जागांवर विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीमधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत, तर आर्थिक दुर्बल पांडुरंग काशीद विजयी झाले आहेत. हमाल-तोलाईदार गटातून अपक्ष उमेदवार माजी संचालक बाबूराव शंकर खोत हे 60 मतांनी विजयी झाले आहेत. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सुरु आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडी या दोन आघाड्यात थेट लढत आहे. विरोधी गटातून एक उमेदवार विजयी झाला आहे. 


आत्तापर्यंत लागलेले निकाल 



  • सत्ताधारी गट - 5 

  • विरोधी - 1 

  • अपक्ष - 1


कशी सुरु आहे मतमोजणी?


बाजार समितीसाठी प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघ, त्यानंतर व्यापारी अडते व माथाडी तोलाईदार या तिन्ही गटांची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर विविध कार्यकारी सेवा संस्था गटाची मतमोजणी होईल. एकूण 36 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण सात फेऱ्यात मतमोजणी होईल. बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे 14 हजार 133, ग्रामपंचायतीतील 5 हजार 733, अडते व्यापारी गटाचे मतदान 1217, माथाडी तोलाई गटाचे 894 मतदान आहे. यापैकी एकूण झालेले मतदान 20 हजार 280 मतदान झाले आहे. 


जयसिंगपूर बाजार समितीसाठी आजच मतदान अन् निकाल 


दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. उर्वरित 11जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यासाठी आज मतदान होत आहे. सेवा संस्था व ग्रामपंचायत या दोन गटातील 2 हजार पाचशे सभासद मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय, जयसिंगपूर येथील कुमार विद्या मंदिर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे व कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय येथे तीन मतदान केंद्रे असून एकूण सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाचनंतर मतमोजणी केली जाणार आहे.


गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध


दरम्यान, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अनेक दशकांमध्ये प्रथमच बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे निवडणूक खर्च वाचला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.


इतर महत्वाच्या बातम्या