Kolhapur Bajar Samiti Election : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर चुरशीने 92.33% मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उद्या (30 एप्रिल) होणाऱ्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिवशाही शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत होत आहे. एकूण 18 जागांसाठी 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे. 480 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडली एकूण 21,600 मतदारांची मतदान होते. या निवडणुकीसाठी 1175 विकास संस्थेतील 14 हजार 133, तर 603 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 733 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. विकास सेवा संस्था गटातून 11, ग्रामपंचायत गटातून चार, व्यापारी-अडते गटातून दोन तर हमाल-तोलाईदार गटातून एक जागा आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रानुसार करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यात मतदान पार पडले. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रानुसार करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील मतदान झाले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते, माथाडी अशा गटामधील उमेदवारांसाठी मतदान झाले. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था सदस्य, व्यापारी अडते सदस्य, माथाडी सदस्यांनी मतदान केले. शेती उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 21 हजार 988 मतदारांपैकी 20 हजार 280 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे शंभर टक्के मतदान झाले तर उर्वरित सर्व ठिकाणी 92 ते 95 टक्के मतदान झाले.
जयसिंगपूर बाजार समितीसाठी उद्या मतदान
दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. उर्वरित 11जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सेवा संस्था व ग्रामपंचायत या दोन गटातील 2 हजार पाचशे सभासद मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय, जयसिंगपूर येथील कुमार विद्या मंदिर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे व कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय येथे तीन मतदान केंद्रे असून एकूण सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाचनंतर मतमोजणी केली जाणार आहे.
गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध
दरम्यान, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अनेक दशकांमध्ये प्रथमच बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे निवडणूक खर्च वाचला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या