Kolhapur : शाळांना असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर आठवडाभरापासू चांगलीच गर्दी वाढली असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. कोल्हापूर कोकणचे प्रवेशद्वार असल्याने व्हाया कोल्हापूर जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोल्हापूर गजबजून गेलं आहे. शालेय सहली सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर वाहतूक पोलिसांकडून येणाऱ्या पर्यटकांना सहा ठिकाणी वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. बेवारस वाहने काढून घेण्यासही सांगण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. त्याचबरोबर हुल्लडबाज तसेच गोव्या अवैध दारू करणाऱ्यांविरोधात लक्ष ठेवण्यात येत आहे. 


कोल्हापूर शहरात या ठिकाणी असेल पार्किंग सुविधा 



  • दसरा चौक

  • बिंदू चौक

  • प्रायव्हेट हायस्कूल मैदान 

  • एमएलजी हायस्कूल मैदान

  • शहाजी महाविद्यालय मैदान

  • दसरा चौक लक्ष्मीबाई जिमखाना टेनिस कोर्ट 


कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पथके तयार 


दरम्यान, कोल्हापूर (kolhapur police) पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नवीन वर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभाग सर्व खबरदारी घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले,  गोव्यातून जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर अंकुश ठेवण्याबरोबरच सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या इतर मार्गांवर वाहतूक कोंडी वाढत असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.


दाजीपूर अभयारण्य बंद राहणार 


दरम्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क, राधानगरी तालुक्यातील  दाजीपूर अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य 30 डिसेंबरपासून बंद राहणार आहेत. संबंधित वन परिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. वनक्षेत्रात आणि धरण परिसरात होणाऱ्या सेलिब्रेशनमुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वन अभयारण्ये आणि परिसरातील पर्यटन स्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवली जातील. 2 जानेवारीपासून ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली होतील.


इतर महत्वाच्या बातम्या