Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport)12 जानेवारीपासून देशातील 20 महत्त्वाच्या शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी (कनेक्टिंग) विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होईल तसेच उद्योग जगताला त्याचा लाभ होणार आहे. 


सध्या कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-तिरूपती या 4 मार्गांवर थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून नियमितपणे सुरु आहे. नववर्षात 13 जानेवारीपासून कोल्हापूर ते बंगळूर आणि पुढे कोईमतूर विमानसेवा सुरू होत आहे. त्याशिवाय कोल्हापूरपासून देशातील काही प्रमुख देशांसाठी कनेक्टींग फ्लाईट उपलब्ध आहेत. त्यानुसार भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतुर, दिल्ली, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनौ, मंगळूर, मुंबई, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी, इंडिगो एअरलाईन्सच्या कनेक्टींग फ्लाईटस् प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. 


कोल्हापूर विमानतळावर चेक इन केल्यानंतर, त्यांना प्रवासाच्या अंतिम ठिकाणापर्यंत बोर्डींग पास मिळेल आणि प्रवाशांचे बॅगेजही परस्पर दुसर्‍या विमानात चढवले जाईल. अंतिम स्थानावर प्रवाशांना त्यांचे लगेज मिळेल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणार्‍यांचा प्रवास सुखकर होणार आहे. कोल्हापुरातून देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये इंडिगो एअरलाईन्सने थेट किंवा अन्य शहरांमार्गे आणि कनेक्टिंग फ्लाईटद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मानसिक त्रास कमी होणार आहे. आणि ही मोठी पर्वणीच उघोग विश्वासाठी ठरणार आहे.


दरम्यान, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच काळापासून ही सेवा उपलब्ध आहे. सध्याचे इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट्स आणि पुढे कनेक्टिंग यामुळे प्रवाशांचे मोठी सोय होत असून याचा सर्वांना फायदा होईल. कारण प्रवाशांना बोर्डिंग पास आणि नोंदी करून लगेज गंतव्य स्थानावर मिळेल, पण बंगलोर आणि कोईमतूर वगळून त्यांना विमान बदलावे लागेल.


इतर महत्वाच्या बातम्या