India Post Accidental Insurance : धकाधकीच्या जीवनात अपघाती विमा (Accidental Insurance) आता काळाची गरज होऊन गेला आहे. त्यामुळे भारतीयांचा नेहमीच विश्वास राहिलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही लोकाभिमुख आहे. विमा क्षेत्रातही बँकेने आता पाऊल ठेवले (India Post Accidental Insurance) आहे. या सुविधेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने डाक विभाग कोल्हापूर मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमार्फत टाटा एआयजी आणि बजाज अलायन्झ या दोन विमा कंपन्यांचा विमा उघडला जात आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) सर्व डाक कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे 795 रुपयात 20 लाखांचा अपघाती विमा उघडण्यासाठी दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती कोल्हापुर विभागाचे, प्रवर अधीक्षक, डाकघर अर्जुन इंगळे यांनी दिली आहे.


दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना


इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Accidental Insurance) ही भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बॅंकिंग सेवा आहे.  भारतीय डाक विभागातर्फे ही सेवा चालवली जाते. अपघात झालेल्या व्यक्तीला शारीरिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी टपाल कार्यालयाने 795 रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज एलायंज या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे. हा अपघाती विमा भारतीय डाक विभागातर्फे उतरवण्यात येतो. त्यात टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम 399 रुपये आणि बजाज एलायंजला 396 रुपये प्रीमिअम भरावा लागतो.


या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 


आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते आवश्यक व कोणत्याही टपाल कार्यालयातून योजनेचा लाभ शक्य आहे. विमा योजनेसोबत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत प्रीमिअम खाते उघडता येते. प्रीमिअम खात्यामध्ये मोफत घरपोच बँकिंग सेवा, वीजबिल भरणा केल्यास त्यावर रोख परतावा, जीवन प्रमाणपत्र, अमर्यादित विनामूल्य रोख ठेव जमा करता आणि काढता येत, असे अनेक फायदे देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी www.ippbonline.com या IPPB च्या वेबसाईटवर भेट देऊ शकता.


कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने जवळ्च्या पोस्ट ऑफिसशी अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा व या सेवेचा या विशेष मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या