Sangli Crime : जबरदस्तीने वेश्‍या व्यवसायास जुंपलेल्या बांगलादेशी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सांगलीमधील (Sangli News) विश्रामबाग पोलिस ठाण्यातील (Sangli Crime) कर्मचारी स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) या संशयितास अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर 4 फेब्रुवारीपर्यंत त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस हवालदार कोळीचे निलंबन केलं आहे.


स्वप्नील कोळी कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यातच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीसह सात लाखांच्या खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सतरा वर्षीय पीडितेची फिर्याद घेतली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मुळची बांगलादेशी असलेली ही मुलगी जानेवारी 2022 पासून सांगलीत स्वरुप चित्रमंदीराजवळील वस्तीत या मुलीला एका महिलेने व्यवसायासाठी आणले होते. हवालदार कोळीने पीडितावर गेल्या वर्षभरापासून अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. संशयित स्वप्नील कोळीने पिडीताकडून सुरुवातीला दोन लाख, तर पोलिसांचा छापा पडण्याआधी माहिती दिल्याबद्दल संबंधित मुलीस आश्रय देणाऱ्या महिलेकडून पाच लाख वसूल केले. गेले वर्षभर याबाबत उच्च न्यायालयात न्यायालयात संबंधित पीडितेने दाद मागितली होती. अप्पर पोलिस अधीक्षकांकडे हा तपास होता. 


पुणे येथील रेस्क्यू फौंडेशनच्या संरक्षण बालगृहात संबंधित मुलीला हलवण्यात आले आहे. वरिष्‍ठांच्या आदेशानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. स्वप्नील कोळीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदींसह सात लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपधीक्षक अजित टिके अधिक तपास करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या