Kolhapur Policeकोल्हापूर (Kolhapur News) पोलिसांमध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोठा फेरबदल करताना 18 पोलिस निरीक्षकांच्या (पीआय) 4 जिल्ह्यांतर्गत आणि चार बदल्या करण्यात आल्या आहेत. पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस व्यवस्थापन मंडळाकडून बदल्या निश्चित केल्या. काही बदल्या अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार आणि नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


स्‍थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी)चे निरीक्षक संजय गोर्ले यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील महादेव वाघमोडे यांची नियुक्ती केली आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यातील निरीक्षक अरविंद काळे यांची बदली करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्‍या निरीक्षक स्नेहा गिरी यांची नियुक्ती केली आहे. मात्र, वाहतूक शाखेकडे अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची बदली रत्नागिरीला झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांची नियुक्ती झाली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांची कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.


सतीशकुमार गुरव आणि श्रीकृष्ण कटकधोंड हे आता अनुक्रमे जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे प्रमुख असतील. राजारामपुरी पोलीस ठाण्यातील ईश्वर ओमासे यांची कागल येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अनिल तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भुदरगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पीआय संजय मोरे आता सांगली पोलिसांत काम पाहणार आहेत. मोरे यांनी अलीकडेच बेकायदेशीर लिंग निर्धारण रॅकेट उघड केले होते. यामध्ये 14 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती.


सहाय्‍यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांची बदली गगनबावडा पोलिस ठाण्यातून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.


इतर महत्वाच्या बातम्या