Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने आज (ED) छापेमारी केली आहे. कागल तालुक्यातील (Kagal)  सेनापती कापशीच्या शाखेमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला होता. 

Continues below advertisement


तसेच 11 जानेवारी रोजीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यामध्येही हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती. 


हसन मुश्रीफांवरील आरोपांचं कोलकाता कनेक्शन काय?


दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या (ED) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या (Sugar Factory) खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील (Kolkata) काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. 


या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत. जवळपास 15 वर्षापूर्वी या कंपन्या बंद पडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 50 कोटी रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. ही रक्कम साखर कारखान्यामध्ये गुंतवल्याची माहिती मिळत आहे.    


ईडीच्या छापेमारीने कागलच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी 


ईडीने केलेल्या छापेमारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक गटातटाचे राजकारण होणाऱ्या कागल तालुक्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. ईडी कारवाई भाजप जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या इशाऱ्याने झाल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. ईडीच्या छापेमारीनंतर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौरा केला होता.  


इतर महत्वाच्या बातम्या