Kolhapur Rain Update : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी (Panchganga River) काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा  विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील तीन बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून घट होऊ लागली आहे. आजपासून आठवडाभर गायब असलेल्या सूर्याचे दर्शन झाल्याने आणखी दिलासा मिळाला. आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 37 फुट 9 इंच इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 आहे, तर धोका पातळी 43 फुट आहे. 


जिल्ह्यातील अजूनही 61 बंधार पाण्याखाली  


कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.  


अलमट्टी धरणातील विसर्ग आणखी वाढवला


अलमट्टी धरणातून (almatti dam) आज सकाळी सकाळी 10 वाजल्यापासून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याआधी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर धरण प्रशासनाने धरणकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यामधील सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या