Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : कोल्हापूर इचलकरंजी शहरातील खासगी क्लासच्या सहलीसाठी गेलेल्या मुलींच्या बसला बारामती- फलटण मार्गावर अपघात झाल्याने चालकासह 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहे. दरम्यान, 24  मुली व स्टाफ सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली जाऊन हा अपघात झाला. 


Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : रोहित पवारांनी घेतली जखमींची भेट


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. रोहित पवार यांनी सांगितले की, शिर्डी-औरंगाबादच्या सहलीवरुन परतताना इचलकरंजीतील विद्यार्थीनींच्या बसला पाहुणेवाडी इथं अपघात झाल्याने जखमी विद्यार्थीनींवर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विद्यार्थीनींची भेट घेऊन विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या विद्यार्थिनींना चांगले उपचार देण्याच्या सूचना अजितदादा आणि सुप्रिया ताईंनीही दिल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनींची तब्येत चांगली असून काळजी नसावी! (Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati)



शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करताना बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीत अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, जखमी मुलींसह चालक व पाच स्टाफ मेंबर यांना स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघातात झाला. बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवीताना बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज आला नाही. यानंतर बस पुलावरून खाली कोसळली. 


Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : पालक बारामतीकडे रवाना


दरम्यान, खासगी क्लासने आयोजित केलेल्या मुलींच्या सहलींच्या बसला अपघात झाल्याचे समजताच पालकांची भंबेरी उडाली.  पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर घरी माहिती मिळताच पालकांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सागर क्लासेसच्या बाहेर मोठी गर्दी पालकांनी केली होती. इचलकरंजी येथील सागर क्लासेस 8 वी ते 10 वीच्या क्लासमधील मुलींची औरंगाबाद,दौलताबाद,वेऊळ,शिर्डी,शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या