Maharashtra Rain Alert : जून महिन्यात चातकासारखी वाट पहायला लावलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा असल्यानं राज्यात पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा अचांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यासह काही भागासह विदर्भातही चांगला पाऊस अपेक्षित आहे.


राजधानी मुंबईतही दमदार पावसाची हजेरी 


काल मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी, तर भायखळा आणि कुलाब्यात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.  204 मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटले जाते. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या