Devendra Fadnavis : राज्यपालांच्या आदेशानंतर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता बंडखोर शिंदे गटाच्या पाठिंब्याने भाजप सरकार सत्तेत शिक्कामोर्तब झालं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रिपद कोणाला मिळणार? याबाबत अजून जाहीरपणे सांगण्यात आले नसले, तरी संभाव्य मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यामध्ये बहुतांश मागील फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील सरकारमधील काही चेहरे डावलले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, समोर आलेल्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीस यांच्यासोबत असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अशिष शेलार, प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून कोणाला मिळणार याची उत्सुकता
कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिपद कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद होते तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रिपद होते, तर शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपद होते.
भाजपकडून आमदार विनय कोरे यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात त्यांचा नावाचा समावेश आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. आमदार प्रकाश आवाडे यांनीही भाजपला पाठिंबा दिला होता.
आता भाजप आणि शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शिंदे गटाला शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना संधी मिळते का? याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर यांचे पारडे जड मानले जात आहे.
संभाव्य मंत्र्याची नावे खालीलप्रमाणे आहेत
कॅबिनेट
- देवेंद्र फडणवीस
- चंद्रकात पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- गिरीश महाजन
- आशिष शेलार
- प्रवीण दरेकर
- प्रसाद लाड
- रवींद्र चव्हाण
- चंद्रशेखर बावनकुळे
- विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
- गणेश नाईक
- राधाकृष्ण विखे पाटील
- संभाजी पाटील निलंगेकर
- राणा जगजितसिंह पाटील
- संजय कुटे
- डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
- सुरेश खाडे
- जयकुमार रावल
- अतुल सावे
- देवयानी फरांदे
- रणधीर सावरकर
- जयकुमार गोरे
- विनय कोरे, जनसुराज्य
- परिणय फुके
- राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर
हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
- नितेश राणे
- प्रशांत ठाकूर
- मदन येरावार
- महेश लांडगे किंवा राहुल कुल
- निलय नाईक
- गोपीचंद पडळकर
शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
कॅबिनेट मंत्री
- एकनाथ शिंदे
- गुलाबराव पाटील
- उदय सामंत
- दादा भुसे
- अब्दुल सत्तार
- शंभूराज देसाई
- बच्चू कडू
- तानाजी सावंत
- दीपक केसरकर
राज्यमंत्री
- संदीपान भुमरे
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
इतर महत्त्वाच्या बातम्या