Kolhapur Municipal Corporation :  “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानातंर्गत नवरात्रोत्सवात कोल्हापूर महापालिकेकडून शहरातील 18 वर्षांवरील 6 हजार 463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  नवरात्रोत्सव निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबरपासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत 18 वर्षावरील 6 हजार 463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची 5 ऑक्टोबरपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.


यामध्ये 18 वर्षांवरील 3 हजार 776 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी उच्चरक्तदाब निदान झालेले 70, रक्तक्षय आढळलेले 36, व मधुमेह निदान झालेल्या 22 महिलांची आढळून आल्या. गर्भधारणापूर्व 161 महिलांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली व कुटुंब नियोजनाबाबत त्यांना समुपदेशन करण्यात आले.


1 हजार 152 गरोदर मातांना वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाब निदान झालेली 19, तसेच 316 गरोदर मातांचे कोविड लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर 30 वर्षांवरील 1 हजार 374 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी, 54 महिलांचे उच्च रक्तदाब, 21 महिलांचे मधुमेहाचे निदान झाले व ह्रदयासंबंधी आजाराच्या 8 रुग्णांचे निदान झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या