Shoumika Mahadik Gokul Meeting : सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया गोकुळच्या संचालिका आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांनी मांडली आहे. या सर्वसाधारण बैठकीत सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तेच आम्ही मांडणार आहोत. वर्षभरात उत्पादक आमच्याकडे आले आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. साध्या प्रश्नांची व्यवस्थित मिळावीत, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गोकुळची 60 वी सर्वसाधारण सभा आज बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलला होत आहे. दुपारी एक वाजता सभेला प्रारंभ होणार आहे. सर्व सभासदांबरोबर मी गोकुळच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शौमिका महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका आहे. बैठकीत आपण प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र अशा ठिकाणी उपस्थित करता याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, बोर्डाच्या बैठकीमध्ये मी प्रश्न उपस्थित करत असते, पण मला प्रत्येकवेळी पुढील वेळी कागदपत्रे दिली जातील असे उत्तर दिले जाते. किंबहुना माझ्या लेखी प्रश्नांना सुद्धा उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे मला मुद्दे बाहेर मांडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सभासदांच्या हिताचे साधे प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नांची साध्या आणि सहज शब्दात उत्तर द्यावी इतकीच आमची अपेक्षा आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे आमचे सभासद मागे बसतात की काय अशी शक्यता निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या.
सभा वादळी होण्याची शक्यता
दरम्यान, या सभेसाठी तगडा बंदोबस्त पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. जवळपास 200 पोलिस तसेच गोकुळचे सुरक्षा रक्षक या सभेसाठी तैनात असतील. ओळखपत्राशिवाय सभेसाठी कोणालाहील एन्ट्री दिली जाणार नाही. सकाळपासून सभासद जमण्यास सुरुवात झाली आहे.
गोकुळच्या सभेसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विरोधकांकडून झालेले आरोप प्रत्यारोप त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. गोकुळमधील वाढलेल्या साडेचारशे दुधसंस्था व त्याच्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप, महालक्ष्मी कारखान्याचे विस्तारीकरण, सौरऊर्जा प्रकल्प उभारणीस मंजुरी आदी मुद्यांवरून सभा वादळी होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या