Ichalkaranji Crime : आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन मित्रांनीच मित्राचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री इचलकरंजीमधील (Ichalkaranji Crime) तीन बत्ती चौकामध्ये ही घटना घडली. या घटनेत राहुल बाबू दयाळ (वय 22 रा. कामगार चाळ, इचलकरंजी) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, पोलिसांनी पूर्ववैमनस्य वादातून खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मृत राहुल आणि संशयितांचा आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. पोलिसांनी खूनाच्या घटनेनंर तिघांना ताब्यात घेतले असून यामधील एक रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेनंतर इचलकरंजीमध्ये (Murder In ichalkaranji) खळबळ उडाली आहे.
दरम्यान मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मयत राहुल साफसफाईचे काम करत होता. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर तो मित्रांसोबत तीन बत्ती चौकामध्ये थांबला होता. त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाद झाला. या वादानंतर त्याच्या दोन मित्रांनी चाकूने वार करत हत्या केली. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या