Kolhapur Love Jihad Case: कोल्हापूरमध्ये (kolhapur) कथिल लव्ह (love jihad) जिहाद प्रकरणातील मुलगी अखेर सापडली आहे. सीमाभागातील संकेश्वर याठिकाणी पोलिसांना हे दोघेही आढळून आले आहेत. हे प्रकरण लव्ह जिहादचे (love jihad) असल्याचे आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरचं वातावरण या संपूर्ण प्रकरणामुळे ढवळून निघालं होत. या मुलीच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक तैनात करण्यात आले होते. अखेर ही मुलगी पोलिसांना सापडली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरपासून (kolhapur) काही अंतरावर असलेल्या सीमाभागातील संकेश्वर याठिकाणी हे दोघे आढळून आले आहेत. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज रात्री उशिरा या दोघांना कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले जाईल. गेल्या 17 दिवसांपासून ही मुलगी आणि तिच्या सोबतचा मुलगा बेपत्ता होते. ही मुलगी अल्पवयीन असून तीच वय 14 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यातच आज याप्रकरणी आंदोलन देखील झालं. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यथाईकानी उपस्थित होते. तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनमध्ये सगभागी झालेल्या नेत्यांनी आणि संघटनांनी या मुलीला आणि मुलाला तात्काळ शोधून काढावं, अशी मागणी केली होती. मात्र आता पोलिसांना हे दोघेही मिळाले आहेत. उद्या सकाळी या दोघांना पोलीस ठाण्यात हजार करण्यात येणार आहे. 


काय आहे प्रकरण? 


कोल्हापूरची (kolhapur) ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि मुलगा गेल्या 17 दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी कोल्हापुरातील (kolhapur) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Old Rajwada Police Station) संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या नातेवाईकांनी हे प्रकरण लव्ह जिहादचं (love jihad) असल्याचा आरोप केला होता. तसेच  पोलिस कारवाई करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. यानंतर या प्रकरणावरून राज्यभरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. यावरून आज आंदोलनही झालं. मात्र आता ही मुलगी आणि मुलगा सापडले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.


संबंधित बातमी:


कोल्हापुरात लव्ह जिहाद? 18 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता