Kolhapur Crime : कोल्हापुरात अपहरण करुन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टोप संभापूरमधील हॉटेल व्यावसायिकाचे आठ ते दहा जणांच्या टोळीने अपहरण करुन सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागितली होती. यामधील 5 लाख रुपये मिळाल्यानंतर व्यावसायिकाला सोडून देण्यात आले. ही घटना शिरोली एमआयडीसी (Shiroli MIDC) परिसरात घडली. हॉटेल मालकाच्या वडिलांनी (Kolhapur Crime)  तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Kolhapur Police) दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.


हातकणंगले तालुक्यातील नागावचे सादिक मुल्लाणी यांचे टोप संभापूरमध्ये हॉटेल आहे. 17 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता सादिक मुल्लाणी यांचे अपहरण करण्यात आले होते. खंडणीखोरांनी त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. सादिक यांचे वडील रेहमान यांनी 18 जानेवारी रोजी पाच लाख रुपये टोप येथील बँक खात्यात जमा केले. त्यानंतर रात्री उशिरा सादिक मुल्लाणी यांना खंडणीखोरांनी सोडून दिले.


व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून अपहरण झाल्याचा पोलिसांचा अंदाज,


रेहमान मुल्लाणी यांनी 19 जानेवारीला पोलीस मुख्यालयात तक्रार दिली. शुक्रवारी (20 जानेवारी) शिरोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात खंडणीतील पाच लाख रुपये टोपच्या फेडरल बँकेतून काढले आहेत. व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून हे अपहरण झाले, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांची (Kolhapur Crime) संख्या वाढली आहे. कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेल्या आकडेवारीवरुन हे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे, गुन्ह्यांचा उकल होण्यातही म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी छोट्या गुन्ह्यांमधील तात्काळ उकल करण्याचे निर्देश दिले आहेत.  


2022 मध्ये सशस्त्र दरोड्याच्या 110 प्रकरणांची नोंद झाली. होती तथापि, आतापर्यंत फक्त 66 प्रकरणांचा उलगडा झाला आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्याचे प्रमाण केवळ 29 टक्के आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ले इत्यादी प्रमुख गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा शोध 100 टक्के आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत पकडण्याचे प्रमाण 99 टक्के आहे. महिलांवरील 563 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2021मध्ये 528 गुन्हे नोंदवले गेले होते. (Kolhapur Crime)


इतर महत्वाच्या बातम्या