कोल्हापूर : जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत झालाय. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या विषबाधेच्या घटनेमुळे कोल्हापूर (Kolhapur News) हादरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुरगूडच्या चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. मात्र काही वर्षांपूर्वी ते पत्नी व काव्या, श्रीयांश या दोन मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले. रणजित आंगज हे मुरगूड येथील एका रुग्णालयात काम करत होते. त्यांच्या घरी कोणीतरी आलेल्या नातलगांनी आणलेल्या बेकरी उत्पादनांपैकी कप केक दोन्ही मुलांनी खाल्ले होते. यांनातर मुळे आणि त्यांच्या आईला उलट्या आणि जुलाब सुरू झाले होते.
मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू
दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी काव्याला रुग्णालयात दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने त्यास घरी सोडले होते. काव्यावर उपचार सुरू करण्यात आले. तर श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला.
मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत
तर मांडरे येथे पाटील कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पांडुरंग विठ्ठल पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर आता कृष्णा पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर पाटील यांच्या घरातील प्रदीप पाटील यांची प्रकृती देखील चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Fancy number plate : कुठंबी हुडीक, शेम टू शेम नंबरची गाडी, आख्खं गाव फॅन्सी नंबरच्या गाड्यांचं!