Kolhapur Crime : इचलकरंजी शहरामधील कुख्यात जर्मन टोळीने स्क्रॅप व्यावसायिकाला धमकावून एक लाखाची खंडणी मागितल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांना मोठा दणका दिला आहे. जर्मनी टोळीवर मोका कायद्यांतर्गत पोलिसांनी तब्बल पाचव्यांदा कारवाई करण्यात आली आहे. सलग पाचव्यांदा मोका कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.


पोलिसांनी खंडणी प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल करून चौघांवर अटकेची कारवाई केली होती. यामध्ये आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, प्रवीण ऊर्फ कन्नड पव्या मल्लाप्पा मगदूम, शुभम सदाशिव पट्टणकुडे, शिवा नारायण शिंगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य एक संशयित अमोल सुनील लोले हा अद्याप फरारी आहे. 


इचलकरंजीमधील टोळीयुद्धाचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईचा धडाका लावल्यानंतर टोळीयुद्धाला काही विराम मिळाला होता. मात्र, अलीकडे घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. जर्मनी टोळीचे म्होरके अविनाश जाधव आणि आदर्श जाधवसह त्यांचे साथीदार जेलमध्ये आहेत. 


असे असतानाही या टोळीतील आनंदा जाधव, प्रवीण मगदूम, शुभम पट्टणकुडे, शिवा शिंगे आणि अमोल लोले यांनी स्क्रॅप व्यावसायिक रफिक नरंदेकर यांच्याकडे एक लाखाची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या टोळीच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळण्यासाठी पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी मोक्का कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळताच जर्मनी टोळीवर पाचव्यांदा मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या