Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती देणारे बनावट पत्र व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांचा सायबर सेल तपास करणार आहे. शिवाजी विद्यापीठाने या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.


शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि लेटरहेड असलेले बनावट पत्र कोणीतरी द्वेषातून हेतूने तयार केले होते. पत्रात म्हटले होते की, अपरिहार्य कारणांमुळे, पदवी विषयांपैकी एका विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या पत्राची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक गोंधळले आणि काही जण परीक्षेला बसू शकले नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्याने सांगितले. 


पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, “कोणत्याही अडथळ्याविना परीक्षा अचूकपणे पार पाडण्याची विद्यापीठाची ख्याती आहे. अशा घटना सर्व संबंधितांसाठी आव्हानात्मक आहेत. आम्ही चौकशी सुरू केली आहे आणि समस्येच्या मुळापर्यंत जाऊ. 


शिवाजी  विद्यापीठातील परीक्षा विभागाचे संचालक अजितसिंह जाधव म्हणाले की, आम्ही सर्वांना आवाहन करतो की, सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही बनावट पत्रावर विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयांची उलटतपासणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. जर कोणाला संशयास्पद पत्र आढळले, तर गोंधळ टाळण्यासाठी ते आमच्या निदर्शनास आणावे.


इतर महत्त्वाच्या बातम्या