Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक तरुण मंडळाचा महागणपती दर्शनासाठी खुला झाला आहे. शिवाजी चौक तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपती कोल्हापूर गणेशोत्सव सोहळ्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शहरासह जिल्ह्यातून भाविक महागणपतीच्या दर्शनासाठी येतात. या मंडळाने गेल्या चार दशकांपासून सामाजिक बांधिलकी जपली आहे.


जरवर्षी महागणपती दर्शनासाठी खुला होत असताना राजकीय टोलेबाजी ठरलेली असायची. त्यामुळे व्यासपीठावरून शहरातील मातब्बर नेते कोण काय बोलणार आणि कोण कोणावर आसू़ड ओढणार? हा नेहमीच चर्चेचा विषय असायचा. मात्र, शिवाजी चौक मंडळाने या राजकीय टोलेबाजीची परंपरा यंदा मोडीत काढताना साधेपणाने सोहळा पार पाडला. 



काल शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाही भाविकांच्या आनंदावर तसभूरही परिणाम झाला नाही. भर पावसात भाविकांना पहिल्याच दिवशी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवाजी चौकातील महागणपतीची मूर्ती नेहमीच 21 फुटी राहिली असून तिची रचनाही बैठ्या स्वरुपातील अत्यंत सुबक आणि डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. 


शिवाजी चौक तरुण मंडळाचाी स्थापना सन 1 मे 1981 रोजी झाली आहे. या मंडळाचा धार्मिक शैक्षणिक तसेच विधायक या कार्यामध्ये आजपर्यंत प्रामुख्याने केला जातो. वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक शैक्षणिक तसेच विधेयक कार्यक्रम घेतली जातात. त्यामध्ये आवर्जून गणेशोत्सव असून मंडळाचा कोल्हापूरचा 21 फुटी महागणपती नवसाला पावणारा म्हणून ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे.


लाखो भक्त या महागणपतीचे दर्शन घेतात व आपले नवस पूर्ण करतात. दरवर्षी सात ते आठ किलो चांदी भक्तांच्या माध्यमातून महागणपती विविध स्वरूपातून वाहिली जाते. तसेच लाखो नारळ आपली नवे पूर्ण करण्यासाठी भाविकांच्या माध्यमातून वाहिले जातात. याच माध्यमातून वर्षभरात अनेक कार्यक्रम मंडळ राबवत असते. 


इतर महत्वाच्या बातम्या