Gram Panchayat Election : जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये, आजरा तालुक्यातील करपेवाडी, चंदगड तालुक्यातील इसापूर आणि राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच थेट जनतनेतून निवडला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. 


निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे



  • 13 सप्टेंबर 2022  : निवडणूक नोटीस प्रसिध्द होणार 

  • 21 ते 27 सप्टेंबर : उमेदवारी अर्ज दाखल करणे 

  • 28 सप्टेंबर  : उमेदवारी अर्जांची छाननी

  • 30 सप्टेंबर  :  उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस 

  • 30 सप्टेंबर : निवडणूक चिन्ह तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार 

  • 13 ऑक्टोबर :  मतदान 

  • 14 ऑक्टोबर : मतमोजणी 


480 ग्रामपंचायतींसाठी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामधील 480 ग्रामपंचायतींसाठी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना झाल्याने आता सरपंच आरक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 21 या कालावधीमध्ये संपलेल्या 5 तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या 480 ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती व जमाती महिला संवर्ग तसेच ओबीसी आरक्षणाचा अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. 


शहरालगतच्या गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा  


निवडणूक होत असलेली अनेक कोल्हापूर शहराच्या वेशीवरची आहेत. ही गावे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीतही आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. शिंगणापूर, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, उचगाव वळीवडे, कंदलगाव, वसगडे, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर गावांचा समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या