Kolhapur News : गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. राज्यातील 281 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी 29 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे.


राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतचे सदस्य मतदार असल्यामुळे सदस्यांची सूची 27 सप्टेंबरपर्यंत बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.






अंतिम मतदार यादी सात डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रियाही सुरु करण्यात आली होती, पण एका विकास संस्थेकडून औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये विकास संस्थांच्या निवडणूका घेतल्याशिवाय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करु नये, अशी मागणी केली होती. 


विकास संस्थांच्या निवडणूका पार पडल्यानंतर न्यायालयाने समित्यांची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या