Ambabai Mandir Paid E-Pass : अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने ई पास परवानगी नाकारताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे. मुख्य दर्शन मार्ग सोडून व्हीआयपी दर्शन आणि ई पेड पास सुविधा देता येणार नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. सह दिवाणी न्यायाधीश सिंघेल यांनी हे आदेश दिले आहेत. श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांची याचिका कोर्टातर्फे मंजूर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य देताना सावधगिरी बाळगावे, असा सल्लाही न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने पेड ई पास देण्यास मनाई केली आहे. मुनीश्वर यांनी ई पास निर्णयाला विरोध करत याचिका दाखल केली होती. मुनीश्वर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेशपत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सात सप्टेंबर 2010 ला जाहीर केल्या होत्या. 15 ऑक्टोबर 2010 मध्ये मंजूर करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नसल्याचे मुनीश्वर यांनी याचिकेत म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या