Maharashtra SSC 10th Result : राज्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून पुन्हा एकदा सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत तब्बल 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये लातूर विभागातून सर्वाधिक 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद विभागातील प्रत्येकी 18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. पुणे विभागात 5 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत, अमरावती 8 मुंबई 1, कोकण 1 नाशिक 1


यंदा दहावीचा राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. निकालात यंदा कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. कोकण विभागात 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला. 


कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर


कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09  टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. 
 
राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली. 


दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. त्याशिवाय MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करून थेट निकाल पाहता येणार आहे.


निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल ?



  • स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा

  • स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

  • स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

  • स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

  • स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 

  • स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा