Kolhapur municipal corporation elections 2022 : प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळाल्याने प्रभागनिहाय 23 जून रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होतील. महापालिकेकडून दिलेल्या मुदतीत मतदारयाद्यांचे काम पूर्ण न मिळाल्याने मुदतवाढ मागितली होती.  नव्या प्रारुप याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकत मुदत असेल. 9 जुलै रोजी अंतिम मतदारयाद्यांवर शिक्कामोर्तब केले जाईल.


यापूर्वी 17 जूनपर्यंत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत होती. मात्र, काम पूर्ण न झाल्याने पालिका प्रशासनाने मतदारयाद्यांसाठी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली. कोल्हापूर महापालिकेत साडे चार लाखांवर मतदार आहेत. प्रभागनिहाय जवळपास 17 हजारांवर मतदार असतील.  
 
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणावरही शिक्कामोर्तब झाले आहे. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार 92 पैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 जागा आहेत.  कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रथमच तीन सदस्यीय पद्धतीने होईल. 


असे आहेत आरक्षित प्रभाग 


अनुसूचित जाती (महिला) 



प्रभाग क्रमांक - 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ,  30 अ, 


अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक - 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ,  18 अ


सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक  - 1 ब, 2 ब, 3 अ,  4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब,  8 अ,  8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13  ब,  14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20  अ, 21 ब,  22 अ,  22 ब,  23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ,  25 ब,  26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ


अनुसूचित जमाती 


प्रभाग क्रमांक - 2 अ 


सर्वसाधारण आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक  - 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब