Shivaji University : राजधानी नवी दिल्लीमधील विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश प्रक्रियेची सुरूवात केली जाणार आहे.

Continues below advertisement


दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळाल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित आहेत तसेच ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे, अशा व्यक्तींनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी केलं आहे. 


युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्र (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील 81 अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे. 


विद्यापीठाच्या www. unishivaji.ac.in या वेबसाईटवर Distance Education या सेक्शनमध्ये  प्रवेशाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या