मुंबई : अत्यंत चुरशीने आणि अतिशय ताणल्या गेलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय खेचून आणला. या विजयाने महाडिक कुटुंबातील पराभवाची मालिका एकप्रकारे खंडित झाली आहे. धनंजय महाडिक यांनी 41.56 मते घेत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप विजयी उमेदवार तसेच पक्षातील इतर नेते विधानसभेच्या पायऱ्यांवर जमा झाले. यावेळी महाडिक बाप लेकांचा भावनिक क्षण पाहायला मिळाला. 


धनंजय महाडिक यांचा विजय होताच त्यांच्या लेकाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर भावना अनावर झाल्याचे दिसून आले. लेकाच्या भावना अनावर झाल्याचे महाडिकांनी त्यांची गळाभेट घेतली व समजूत घातली. हा संपूर्ण क्षण काहीसा भावूक करणारा होता. 



महाडिकांना संजय राऊतांपेक्षा जास्त मते


यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या विजयानंतर पाहायला मिळाला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊत पेक्षाही जास्त मता घेतलेली आहेत. आमचे माननीय पियुष गोयल 48 मते घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले. तेवढीच मते डॉक्टर बोंडे यांना मिळाली. त्यानंतर आमचे धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. शिवसेनेचे ऑफिशियल कॅंडिडेट संजय राऊत यांच्या पेक्षा ही मते जास्त आहेत. 


बाद झालेलं मत धरलं असते, तरी आमचा विजय 


शिवसेनेकडून सुहास कांदे यांचं मत अवैध ठरलं, ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता त्यामुळे हा कविन्सिंग व्हिक्ट्री आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पूर्ण कोटा कम्प्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या सगळे आमदारांचा आम्हाला साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांचा आणि आमच्या सोबत नव्हते तरीही ज्यांनी आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोट्या पक्षात जे काही आमदार आहेत अशा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो असेही फडणवीस म्हणाले. 


विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित


विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. पुन्हा एकदा जे स्वतःला महाराष्ट्र समजतात ते स्वतःलाच मुंबई समजतात स्वतःला मराठी समजतात त्यांना हे लक्षात आणून दिलं या विजयाने की महाराष्ट्र म्हणजे ते नाही महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता मुंबई म्हणजे मुंबईत राहणारी जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे या महाराष्ट्रात राहणारे आणि मराठी मला विश्वास आहे कोणालाही या बद्दल वाईट बोलायचं नाही. कोणाला दुखवायचं नाही, कोणाचा उपवास करायचा नाहीये पण विजयी मालिका सुरू झाली आहे आणि अशीच पुढे सुरू राहील. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Devendra Fadanvis : चालली नाही पवारांची 'पॉवर',  राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर